पैठणमध्ये १६० किलो गोमांससह एक लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Foto
 सहा जनांवर गुन्हे दाखल, तीन जणांना अटक

पैठण, (प्रतिनिधी): पैठण शहरातील कुरेशी मोहल्ला येथे कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा मारून याठिकाणी विनापरवाना गोमास विक्री करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याकडून १२० किलो गोमांस तसेच तीन गोवंश असा ७८००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी या संदर्भात इमान मन्नान कुरेशी ३५, इर्शाद मन्नान कुरेशी ३१, मन्नान बाबामिया कुरेशी ३० सर्व राहणार कुरेशी मोहल्ला पैठण या तिघांना अटक केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अनिल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपी विरुद्ध  महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

तर याच ठिकाणी फारुख शमशुद्दीन कुरेशी ५०, शब्बीर रशीद कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला पैठण हे विनापरवाना गोमांस विक्री करताना आढळून आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून ४० किलो गोमांस व ३ गोवंश असा ६६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी छापा मारून गोमांस व गोवंश जप्त केल्याची कारवाई केली आहे.